एमएसबीबीची दृष्टी
महाराष्ट्रातील समृद्ध जैवविविधतेचे संवर्धन व शाश्वत व्यवस्थापन करणे, यासाठी राज्यातील विविध परिसंस्था, प्रजाती आणि जनुक संसाधनांचे संरक्षण करून ते भावी पिढ्यांसाठी सुरक्षित राखणे, तसेच जैवसंपत्तिच्या उपयोगातून निर्माण होणाऱ्या लाभांचे न्याय्य आणि समतोल वाटप सुनिश्चित करणे.
आमची दृष्टी पश्चिम घाटातील जैवविविधता हॉटस्पॉट, किनारी व सागरी परिसंस्था आणि महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अधिवासांचे संरक्षण करण्यावर केंद्रित आहे, ज्यामुळे महाराष्ट्र राज्य हे जैवविविधता संवर्धनासाठी देशातील आदर्श राज्य म्हणून उभे राहील.
दृष्टीचे प्रमुख स्तंभ
- उत्कृष्ट संवर्धन (Conservation Excellence)
- शाश्वत संसाधन व्यवस्थापन (Sustainable Resource Management)
- समुदाय सहभाग (Community Participation)
- न्याय्य लाभवाटप (Equitable Benefit Sharing)