#महाराष्ट्राची जैवविविधता
महाराष्ट्राची समृद्ध जैवविविधता
महाराष्ट्रातील समृद्ध वनस्पती आणि प्राणी विविधतेला डेक्कन पठार, पश्चिम घाट आणि पश्चिम किनारा या तीन महत्त्वाच्या जैवभौगोलिक प्रदेशांचा आधार आहे. जैवविविधतेचे हॉटस्पॉट आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या पश्चिम घाटांसह महाराष्ट्राला अरबी समुद्रालगत ८४० किमी लांबीचा किनारा लाभला आहे.
सध्या राज्यातील संरक्षित क्षेत्र जाळ्यात ६ राष्ट्रीय उद्याने, ४८ वन्यजीव अभयारण्ये आणि ६ संवर्धन राखीव क्षेत्रांचा समावेश असून ते राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या ३.०३% भाग व्यापतात.